कल्याण डोंबिवलीत ५३७ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू
३६,६६८ एकूण रुग्ण तर ७४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४९६ रुग्णांना डिस्चार्ज.......

कल्याण डोंबिवलीत ५३७ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू
३६,६६८ एकूण रुग्ण तर ७४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू
तर २४ तासांत ४९६ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण (kalyan): कल्याण डोंबिवली महानगरपालिका (muncipal corporation) क्षेत्रात आज नव्या ५३७ कोरोना रुग्णांची (Corona) करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या ५३७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३६,६६८ झाली आहे. यामध्ये ५२३७ रुग्ण उपचार घेत असून ३०,६८७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७४४ जणांचा कोरोनामुळे (Corona) मृत्यू झाला आहे. आजच्या ५३७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ६५, कल्याण प.- १७७, डोंबिवली पूर्व १७१, डोंबिवली प- ९१, मांडा टिटवाळा – १६, मोहना येथील १७ रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४३ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून (covid care center) डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहे.
कल्याण , ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
_________
Also see : राईबाई किनर यांचा अखेर दुर्दैवी निधन
https://www.theganimikava.com/Raibai-Kinar-finally-dies-unfortunate