कल्याण डोंबिवलीत  ४८५ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४८५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे

कल्याण डोंबिवलीत  ४८५ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू
485 new patients and 6 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत  ४८५ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

३१,९८८ एकूण रुग्ण तर ६८४ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ३२४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४८५ कोरोना (corona) रुग्णांची(patient) नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ४८५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३१,९८८   झाली आहे. यामध्ये ३९७८ रुग्ण उपचार घेत असून २७,३२६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 

आजच्या ४८५ रूग्णांमध्ये कल्याण (kalyan)पूर्व – ६३,  कल्याण(kalyan) प.- १०८, डोंबिवली पूर्व १७६, डोंबिवली प- ९०, मांडा टिटवाळा – ३९, मोहना -७, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९८ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ६ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ११ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड(covid) समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण(patient) हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन(Home isolation) मधून बरे झालेले आहेत.

कल्याण
प्रतिनिधी-कुणाल म्हात्रे

_______

Also see: कल्याणची भाग्यश्री ठरली ‘मिसेस इंडिया यूके २०२० क्लासिक'

https://www.theganimikava.com/mrs-india-uk-2020-winner-bhagyashree-from-kalyan