कल्याण डोंबिवलीत ४६३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू        

३९,९३१ एकूण रुग्ण तर ७८५ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५४४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत ४६३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू        
Pimpri Chinchwad Corona Updates

कल्याण डोंबिवलीत ४६३ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू

३९,९३१ एकूण रुग्ण तर ७८५ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ५४४ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (muncipal corporation) क्षेत्रात आज नव्या ४६३ कोरोना (corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५४४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ४६३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३९,९३१ झाली आहे. यामध्ये ४७७३ रुग्ण उपचार घेत असून ३४,३७३  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ४६३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५७, कल्याण प – १४१, डोंबिवली पूर्व १५१, डोंबिवली प- १०२, मांडा टिटवाळा –९, मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून(covid care center), २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण,ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_____________

Also see : आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी परवानग्यांची संख्या कमी करण्यात येणार 

https://www.theganimikava.com/The-number-of-permits-will-be-reduced-to-boost-the-hospitality-sector