कल्याण डोंबिवलीत ४५८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

३८,७५९ एकूण रुग्ण तर ७६८ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५७५ रुग्णांना डिस्चार्ज.....

कल्याण डोंबिवलीत ४५८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू
458 new patients and 6 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत ४५८ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

३८,७५९ एकूण रुग्ण तर ७६८ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ५७५ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका (municipal corporation) क्षेत्रात आज नव्या ४५८ कोरोना (corona) रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ५७५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ४५८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३८,७५९ झाली आहे. यामध्ये ५३२८ रुग्ण उपचार घेत असून ३२,६६३  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ७६८ जणांचा कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला आहे. आजच्या ४५८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६५, कल्याण प – १३८, डोंबिवली पूर्व १४०, डोंबिवली प- ८८, मांडा टिटवाळा –१६, मोहना –९, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून,  १० रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून (covid care center), २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, १ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.