मनसेच्या जनधन बँक योजनेचा ४०० जणांचा घेतला लाभ
कल्याण येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित जनधन बँक योजनेच्या शिबिराचा ४०० जणांनी लाभ घेत बँक खाते उघडले आहे.
मनसेच्या जनधन बँक योजनेचा ४०० जणांचा घेतला लाभ
कल्याण (Kalyan): कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ४० वालधुनी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आयोजित जनधन बँक योजनेच्या शिबिराचा ४०० जणांनी लाभ घेत बँक खाते उघडले आहे.
प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ग्राहक सरकारी (gov) बँकांप्रमाणेच, खासगी बँकांमध्येही जनधन अकाऊंट सुरु करु शकतात. जनधन खात्यात जमा असलेल्या रकमेवर व्याजाची सुविधा असून खातेधारकाला निशुल्क मोबाईल बँकिंगची सुविधा मिळते. जनधन खातेधारक आपल्या खात्यातून १० हजार रुपयांचं ओवरड्राफ्ट करु शकतो. म्हणजे खात्यात पैसे नसतानाही १० हजार रुपये काढता येऊ शकतात. परंतु ही सुविधा खातं सुरु केल्यानंतर काही महिन्यांनंतरच मिळते. या जनधन खात्याद्वारे निशुल्क दोन लाख रुपयांचा अपघाती विमादेखील मिळतो. यात ३० हजारांचाही विमा मिळू शकतो. खातेधारकाच्या निधनानंतर त्या व्यक्तीच्या नॉमिनीला ही रक्कम मिळू शकते.
या खात्यात कोणताही मिनिमम बॅलेन्स ठेवण्याची आवश्यकता नाही. परंतु चेकबुकची सुविधा घेतल्यास मिनिमम बॅलेन्स ठेवणं गरजेचं आहे. भारतात राहणारा १० वर्षांवरील कोणताही नागरिक जनधन खातं सुरु करु शकतो. असे विविध फायदे असलेल्या या जनधन बँक योजनेच्या अंतर्गत खाते उघडण्याचे शिबीर मनसेच्या वतीने वालधुनी येथे आयोजन करण्यात आले होते. याचा ४०० नागरिकांनी लाभ घेतला.
या शिबिराचे आयोजन मनविसेचे शहर उपाध्यक्ष सतीश उगले, उपविभाग प्रमुख, कैलास आडोळे, शाखा अध्यक्ष राहुल जाधव आदींनी केले होते.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
______
Also see : बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक नुकसान भरपाई ,आणि रस्ते पुल दुरुस्ती करा, आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य, बागलाण तालुका