कल्याण डोंबिवलीत ३९२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

४३,७८४ एकूण रुग्ण तर ८५० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४८१ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत ३९२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू
392 new patients and 6 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत ३९२ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

४३,७८४ एकूण रुग्ण तर ८५० जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ४८१ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३९२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३९२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४३,७८४ झाली आहे. यामध्ये ३५७६ रुग्ण उपचार घेत असून ३९,३५८  रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८५० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३९२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ५२, कल्याण प – १२२, डोंबिवली पूर्व ११८, डोंबिवली प- ७७, मांडा टिटवाळा – १७, तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ४ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

____________

Also see : पोस्टर चिपका ओ गांधीगिरी आंदोलन..

https://www.theganimikava.com/Poster-Stick-O-Gandhigiri-Movement