कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

४२,८०६ एकूण रुग्ण तर ८३३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४१३ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू
373 new patients and 7 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

४२,८०६ एकूण रुग्ण तर ८३३ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ४१३ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (Kalyan) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३७३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३७३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४२,८०६ झाली आहे. यामध्ये ३८५१ रुग्ण उपचार घेत असून ३८,१२२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३७३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १०१, कल्याण प – १००, डोंबिवली पूर्व ९५, डोंबिवली प- ६६, मांडा टिटवाळा – ६, तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

_________

Also see :  डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालयात पॅरालीसीस ट्रीटमेंट युनिट सुरु

https://www.theganimikava.com/Dr-D-Y-Paralysis-treatment-unit-started-at-Patil-Ayurveda-Hospital