कल्याण डोंबिवलीत ३२८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू
४४,३९२ एकूण रुग्ण तर ८६४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३७६ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत ३२८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू
४४,३९२ एकूण रुग्ण तर ८६४ जणांचा आतापर्यंत मृत्यू
तर २४ तासांत ३७६ रुग्णांना डिस्चार्ज
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका आज नव्या ३२८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या ३२८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,३९२ झाली आहे. यामध्ये ३३८९ रुग्ण उपचार घेत असून ४०,१३९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३२८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४४, कल्याण प – ९४, डोंबिवली पूर्व ११३, डोंबिवली प- ७२, मांडा टिटवाळा – १, तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १३ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण, ठाणे
प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे
___________
Also see : धनगर समाजाच्या सर्व नेतृत्वाने एकत्र आले तरच समाजाच्या पदरी आरक्षण पडेल-दत्ता वाकसे