कल्याण डोंबिवलीत ३०७ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू

४१,७७३ एकूण रुग्ण तर ८१६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण डोंबिवलीत ३०७ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू
307 new patients and 4 deaths in Kalyan Dombivali

कल्याण डोंबिवलीत ३०७ नवे रुग्ण तर ४ जणांचा मृत्यू

४१,७७३ एकूण रुग्ण तर ८१६ जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण (kalyan): कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३०७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ४ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या ३०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४१,७७३ झाली आहे. यामध्ये ४१८० रुग्ण उपचार घेत असून ३६,७७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८१६ जणांचा कोरोनामुळे (corona) मृत्यू झाला आहे. आजच्या ३०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-४७, कल्याण प – १०४, डोंबिवली पूर्व ८२, डोंबिवली प- ४९, मांडा टिटवाळा – १५, मोहना – ६, तर पिसवली येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल मधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे

___________

Also see : स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य कर्यकरणी जाहीर

https://www.theganimikava.com/Swabhimani-Sangharsh-Sena-Maharashtra-State-Pandharpur-Taluka-and-Solapur-District-Executive-announced