पालघरमधील धामणी धरणाचे दरवाजे उघडले | Dhamni Dam | Palghar

पालघर (Palghar) जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस (rainfall) होत असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले सुर्या प्रकल्पाचे धामणी धरण (dhamni dam)  96.22% भरलं

पालघरमधील धामणी धरणाचे दरवाजे उघडले | Dhamni Dam | Palghar
3 of 5 doors opened of Dhamni Dam

पालघरमधील धामणी धरणाचे पाच पैकी तीन दरवाजे दीड फुटाने उघडले | Dhamni Dam | Palghar

  पालघर जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले सुर्या प्रकल्पाचे धामणी धरण  96.22% भरलं असल्याने आणि सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे धामणी धरणाचे तीन दरवाजे दिड फुटाने उघडले असून धामणीमधून 4655 क्यूसेक आणि कवडास मिळून 10614 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुर्या नदीद्वारे करण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठावरील गावाना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्या तरीही कोणताही धोका नसल्याचा सुर्या प्रकल्पाकडून सांगण्यात आलं आहे.

  या धरणातून वसई विरार महानगर पालिका, डहाणू अदानी प्रकल्प, बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्र, इतर सर्व शहर आणि शेती साठी पाणी पुरवठा होतो.

पालघर

प्रतिनिधी - राजेंद्र पाटील

--------------

Also see : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ नद्यांना पूर येण्याची शक्यता | Flood of 2 dams | BMC | Water Engineer Department

 https://www.theganimikava.com/bmc-possibility-of-flood-of-2-dams-water-engineer-department